अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना | Annasaheb Patil Loan

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना: नॉन-क्रिमिलेअर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार) असलेल्या उमेदवारांच्या गटासंदर्भात, बँक कर्ज मर्यादा प्रती गटास कमीत कमी रु. 10 लाख ते जास्तीत जास्त रु.50 लाखापर्यंतच्या देण्यात आलेल्या उद्योग उभारणी कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी या पैकी जे कमी असेल ते जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराने आणि रु.15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) या अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल. तसेच या योजनेकरिता एकूण प्रस्तावित निधीच्या किमान 4 टक्के निधी दिव्यांगांसाठी (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या दिव्यांगांच्या व्याख्येनुसार) राखीव ठेवण्यात येत आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांचा बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमे वरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

अर्जदारांना महत्वाची सूचना:

  • कर्ज मंजूरीच्या दृष्टीने महामंडळाचा कोणत्याही अशासकीय संस्थेशी/ व्यक्तीशी करार झालेला नसून लाभार्थ्यांनी कोणत्याही संस्थेच्या/ व्यक्तीच्या आमीषाला बळी पडू नये. लाभार्थ्यांनी स्वत: बँकेकडे जाऊन कर्ज प्रकरण दाखल करावे.
  • ज्या महिला बचत गट शेती पुरक व्यवसाय करत असतील अशा सर्व महिला बचत गटांना महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत (IR- II ) असलेली जास्तीत-जास्त वयाची अट रद्द करण्यात येत आहे.
  • शासनमान्य कोणताही गट ज्यांचे सदस्य 100 टक्के शेतकरी वर्गातील असतील व त्यांना शेतीसंबंधीत व्यवसाय सुरु करावयाचे असतील तर अशा गटांतील सदस्यांकरीता कमाल वय मर्यादेची अट असणार नाही.
  • गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत या अगोदर बँक कर्ज मर्यादेची रक्कम किमान 10 लाख रुपये ते कमाल 15 लाख रुपयांची होती ही अट शिथील करुन सुधारीत बँक कर्ज मर्यादा जास्तीत-जास्त 50 लाख करण्यात येत आहे.

अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) प्रकल्पाचे क्षेत्र (पूर्णत: महाराष्ट्र राज्यातीलच असावे)

I. कृषी, संलग्न व पारंपारिक उपक्रम
II. लघु व मध्यम उद्योग – अ) उत्पादन, ब) व्यापार व विक्री
III. सेवा क्षेत्र

अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) प्रकल्प क्षेत्रानुसार लक्ष्यांक अंदाजपत्रक:

प्रकल्प क्षेत्रानुसार लक्ष्यांक अंदाजपत्रक

खालील प्रकारचे गट अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत पात्र असतील.

  • शासनमान्य बचत गट (इतर कोणत्याही शासकीय योजनेत मान्य असलेले)
  • भागिदारी संस्था (निबंधक, महाराष्ट्र राज्य, भागिदारी संस्था, मुंबई यांनी प्राधिकृत केलेले)
  • सहकारी संस्था (जिल्हा उपनिबंधक यांनी प्राधिकृत केलेले)
  • कंपनी/Limited Liability Partnership (LLP) / Society (कंपनी कायदा 2013 च्या Web Portal नुसार)

अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) गटाची नाव नोंदणी:

गटातील उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल. प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्ताव पत्र ठरत असल्यास गटास संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of Intent ) दिले जाईल. गटाने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करुन घ्यावे.

अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) व्याज रक्कमेचा परतावा:

  • गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत अथवा रु. 15 लाखाच्या मर्यादेत) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा मंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणीकृत असून प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएफएस) या अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल.
  • महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल, या ऐवजी इतर कोणतेही Charges / Fees / देयके अदा करणार नाही.

अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना:

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार गट सदस्यांनी यापूर्वी या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • दिनांक 01 जानेवारी, 2019 पासून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 तर महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल. परंतू वयाची अट कृषी व पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना व कंपनी कायदा 2013 अंतर्गत स्थापना केलेल्या एफ.पि.ओ. व दिव्यांग गटांना लागू असणार नाही.
  • अर्जदाराचे कौंटूबिक वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमिलेअरच्या मर्यादेत (जे 8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र) अथवा कुटुंबाचे ITR प्रमाणे वार्षिक सकल उत्पन्न (Gross Income) ग्राह्य धरण्यात येईल व निव्वळ उत्पन्न (Net Taxable Income) ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी गटाने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/ कार्यरत असलेल्या व CBS प्रणालीयुक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.
  • गटातील प्रत्येक अर्जदार सदस्य हा आर्थिकदृष्टया मागास असावा.
  • या योजनेअंतर्गत (i) भागीदारी संस्था (ii) सहकारी संस्था (iii) बचत गट, (iv) एल.एल.पी. (v) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील.
  • या योजनेअंतर्गत कृषी व पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटाकरीता असलेली कमाल वयाची अट वगळण्यात आली आहे.
  • 1 जानेवारी 2019 पासून वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजने (IR–I) अंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतर पुढील 7 दिवसांच्या कालावधीमध्ये (शासकीय सुट्टया वगळून) आपले पात्रता प्रमाणपत्र ( L.O.I ) मंजूर/ नामंजूर/ त्रुटी/ अपूर्ण असल्याबाबतचे कळविण्यात येईल.
  • दिव्यांगासाठी योजनानिहाय एकूण निधीच्या 4 टक्के निधी राखीव ठेवण्यात येईल. दिव्यांग हा व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. गट प्रकल्पासाठी गटाचे 100 टक्के लाभार्थी- सदस्य दिव्यांग असावेत. गटातील महामंडळासोबत व्यवहार करणारा प्राधिकृत प्रतिनिधी हा दिव्यांग लाभार्थी-सदस्य असावा.
  • व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त 5 वर्ष व व्याजाचा दर जास्तीत-जास्त द.सा.द.शे. 12% असेल.
  • अर्जदार गटास केवळ एकाच गट योजनेखाली अर्ज करता येईल. मात्र एका योजनेखाली आर्थिक मर्यादेचे विभाजन न करता एकाच रकमेसाठी अर्ज सादर करावा.

अर्ज प्रणाली व अंमलबजावणीची पध्दत:

  • गटाने (गटाच्या प्राधिकृत संचालक प्रतिनिधीद्वारे) योजनेअंतर्गत सर्वप्रथम मंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीवर नोंदणी करुन अर्ज करणे अनिवार्य असेल.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरीता महामंडळाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करते वेळीस, आधारलिंक मोबाईलवर O.T.P. द्वारे, मोबाईल ॲप द्वारे अथवा तत्सम U.I.D. युक्त प्रणालीद्वारे नोंदणी करावयाची आहे. यासाठी उमेदवाराने सध्याचा वापरात असलेला मोबाईल नंबर, आधार क्रमांकासोबत अद्यावत ( LINK ) करावा, कारण नोंदणी करताना सदरचा O.T.P. नमूद केल्याशिवाय नोंदणी प्रक्रीया पूर्ण होऊ शकत नाही.
  • अर्जकर्त्यांने, गटास अटी व शर्ती मंजूर असल्याचे शपथपत्र हे ऑनलाईन फॉरमॅटमध्ये भरावयाचे आहे.

ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारास महत्वाचे चार दस्तावेज अपलोड करणे अनिवार्य असेल:

  • आधार कार्ड:
    • (अर्जदार सदस्यांचे फोटो व आधार क्रमांक असलेली बाजू अपलोड करणे आवश्यक असेल)
  • रहिवासी पुरावा:
    • (खालीलपैकी एक पुरावा जोडलेला असणे आवश्यक असेल) अद्यावत लाईट बील / अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक / अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला/ रेशन कार्डची प्रत / अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत / भाडे कराराची प्रत ( ( उपरोक्त पैकी पुरावा जोडताना अर्जदाराच्या नावाचा नसेल तर संबंधिताशी असणारे नाते दर्शविणारा अन्य पुरावा जोडावा)
  • उत्पनाचा पुरावा:
    • (गटातील सर्व लाभार्थ्यांसाठी आवश्यक असेल.) तहसिलदारांनी दिलेले अद्यावत कौटूंबिक उत्पन्नाचा दाखला किंवा अद्यावत ITR ची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) दोन्हीही एकत्र जोडणे आवश्यक
  • IV. जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला
    • गटातील अर्जकर्त्याने गटाकरीता ऑनलाईन अर्ज भरुन Submit केल्याच्या पुढील 7 दिवसांच्या आत ( शासकीय सुट्टया वगळून ) संबंधित गट कर्ज व्याज परताव्या घेण्यासाठी पात्र आहे किंवा नाही किंवा त्यामध्ये असलेल्या त्रुटींबाबत कळविण्यात येईल. तद्नंतर लाभार्थी गट या योजनेअंतर्गत व्याज परतावा प्राप्त करण्यासाठी पात्र असल्यास संबंधित गटाचे पात्रता प्रमाणपत्र (LOI) ऑनलाईन प्राप्त होईल.
    • प्राप्त LOI अर्जकर्त्या गटाने बँकेकडून कर्ज घेतेवेळी सादर करावयाचा असून हे LOI तीन महिन्यांकरीता वैध राहील. त्यानंतर LOI नुतनीकरण करण्याचा कालावधी हा वैधता संपल्यानंतर 30 दिवसांच्या मर्यादेचा असून पात्रता प्रमाणपत्राचे Revalidation निशूल्क करण्यात येईल त्यानंतर LOI कोणत्याही कारणाने अवैध झाले तर नुतनीकरणारकरीता 500/- रुपये शुल्क आकारण्यात येऊन पात्रता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यात येईल.
    • गटातील एकाच प्राधिकृत संचालक प्रतिनिधीने (ज्याचे वेबपोर्टलवर नोंदणी झालेली आहे) महामंडळाशी व्यवहार करणे अपेक्षित असेल व अशा अधिकार पत्राची प्रत, महामंडळास ऑनलाईन सादर करणे आवश्यक राहील. हा संचालक प्रतिनिधी हा त्याच गटाचा लाभार्थी सदस्य असणे अनिवार्य असेल. आवश्यकतेनुसार जर नोंदणीकृत अधिकारी बदलावयाचे असेल तर गटाने आवश्यक ठरावाची प्रत ऑनलाईन अपलोड करावी व त्याकरीता 500/- रुपये शुल्क आकारण्यात येईल.
    • गटाने व्यवसाय सुरु केलेनंतर 6 महिन्यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.
    • गटाने कर्ज देणाऱ्या बँकेच्या नियमानुसार सतत व्याजाची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतर, एक-रकमी स्वरुपात महामंडळ हे गटाच्या आधारलिंक कर्ज खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करेल. प्रत्येक महिन्याला वेळेवर हफ्ता परतफेड केल्यास मासिक परतावा देणेत येईल.
    • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी गटातील 60 टक्के सदस्य संचालक मंडळाचे 60 टक्के सदस्य हे ज्यांच्यासाठी कोणतेही महामंडळ अस्तित्त्वात नसलेल्या प्रवर्गातील असणे अवश्यक आहे.
    • गटाने व्यवसाय सुरु केल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे 2 फोटो अपलोड करावयाचे आहेत. तसेच त्यानंतर प्रत्येक 4 महिन्यानंतर गटाने त्याच्या व्यवसायाचे अद्ययावत फोटो अपलोड करावयाचे आहेत.
    • गटाला महामंडळाच्या योजनेचा लाभ प्राप्त झाल्यानंतर, गटाच्या व्यवसायाच्या फलकावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक सहाय्यातून सदरचा व्यवसाय सुरु केल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख करावा. (उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सौजन्याने)

अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत लाभार्थी पात्रता:

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे अनिवार्य आहे.

अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत अटी व शर्ती:

  • अर्जदार पुरुषांकरिता वयाची अट जास्तीत जास्त 50 वर्ष तर महिला अर्जदाराकरिता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल.
  • 50 वर्षे वरील पुरुष उमेदवार व 55 वर्षावरील महिला उमेदवारांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत अर्ज करता येणार नाही.
  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ही योजना सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी व योजनेची अंमलबजावणी सुरु केल्यानंतर स्थापन झालेल्या नवीन उद्योगांसाठी लागू असेल.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने निर्धारती केलेल्या मर्यादेमध्ये असावे.
  • ऑनलाईन व्याज परताव्याची मागणी करताना संबंधित लाभार्थी जास्तीत-जास्त 3 महिन्यांच्या क्लेमची मागणी करु शकतो.
  • गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधारकार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
  • गटाने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) या अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे
  • गटातील उमेदवाराने / व्यक्तीने या महामंडळाच्या व इतर महामंडळाच्या गट किवां वैयक्तिक योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  • अक्षम मापदंडांच्या अंतर्गत अर्ज करताना अर्जदाराकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला केवळ एकदाच अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.
  • 1 एप्रिल 2021 पासून व्याज परताव्याच्या लाभासाठी बँक कर्ज मंजुरीच्या दिनांकापूर्वी L.O.I प्राप्त करणे अनिवार्य असेल व उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • व्यासायिक वाहनाचे कर्ज घेतले असल्यास त्याचा हप्ता माहे असणे आवश्यक आहे, तथा व्यावसायिक वाहनावर नियमित भरणा केलेल्या कराची पावती अद्यावत करणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार दिव्यांग असेल तर अर्ज दाखल करताना दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. दिव्यांग उमेदवाराकडे सक्षम यंत्रणेने दिलेले प्रमाणपत्र असावे.
  • 1 सप्टेंबर 2019 पासून व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाचे नाव, उद्योग आधार नोंदणी तपशील, उद्योगाचा फोटो व बँकेच्या कर्ज मंजूरीवर उद्योगाचे नाव नमूद असल्याचा तपशील / पुरावा अपलोड करावा.
  • व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रती माहे असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार व्यक्ती कुठल्याही बँकेचा किंवा वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण / तरुणींना दिला जाईल यासाठी ज्यांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे. तेच या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
  • 1 सप्टेंबर 2019 पासून व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाचे नाव, उद्योग आधार नोंदणी तपशील, उद्योगाचा फोटो व बँकेच्या कर्ज मंजूरीवर उद्योगाचे नाव नमूद असल्याचा तपशील / पुरावा अपलोड करावा.
  • अर्जदाराला या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय हा फक्त महाराष्ट्र राज्यात सुरु करणे बंधनकारक आहे.

अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू)
  • रहिवाशी दाखला
  • उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
  • जातीचा दाखला
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • प्रकल्प अहवाल

व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत बँकेतून कर्ज घेताना आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • वीज बिल
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • सिबिल रिपोर्ट
  • व्यवसाय-प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • बँक कर्ज मंजुरी पत्र
  • बँक स्टेटमेंट
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसायाचा फोटो

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) साठी अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) वर क्लिक करावे लागेल.
Annasaheb Patil Karj Yojana Home Page

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
Annasaheb Patil Karj Yojana Apply Here

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करायची आहे.
Annasaheb Patil Karj Yojana Select Your District

  • आत तुमच्यासमोर या योजनेचा ऑनलाईन अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती (अर्जदाराचे पहिले नाव, अर्जदाराचे मधले नाव, अर्जदाराचे आडनाव, जन्म दिनांक, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल, लिंग इत्यादी) भरायची आहे व जातं करा बटनावर क्लिक करायचं आहे.
Annasaheb Patil Karj Yojana Personal Information

  • आता तुम्हाला ग्रुप/कंपनी तपशील भाग 1 मध्ये विचारलेली सर्व माहिती (गट/कंपनी/उद्योगाचे नाव, कंपनी नोंदणी क्रमांक, उत्पादकांचा/कंपनी चा प्रकार, गट/कंपनीच्या संचालकांची माहिती व त्यांची संख्या, भागधारक/सदस्य/लाभार्थीचे तपशील इत्यादी) भरायची आहे व जतन करा बटनावर क्लिक करायचे आहे.
Annasaheb Patil Karj Yojana Company Info 1

  • आता तुम्हाला ग्रुप / कंपनीचा तपशील भाग 2 मध्ये विचारलेली माहिती (कंपनी / गट क्रमांक, गट / कंपनीच पॅन कार्ड नंबर, गट/कंपनीचा कार्यालय पत्ता, व्यवसायाचे नाव, व्यवसायाचा पत्ता, अंतिम तयार होणारे उत्पादन/सेवा, बँकेकडून आवश्यक असलेली कर्ज रक्कम, ) भरायची आहे व जतन करा बटनावर क्लिक करायचे आहे.
Annasaheb Patil Karj Yojana Company Info 2
Annasaheb Patil Karj Yojana Company Info 1.1
Annasaheb Patil Karj Yojana Company Info 1.2
Annasaheb Patil Karj Yojana Company Info 1.3

  • आता तुम्हाला तुमचे दस्तावेज अपलोड करायचे आहेत व सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
Annasaheb Patil Karj Yojana Documents Upload

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
Annasaheb Patil Home Page

  • आता तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल.
Annasaheb Patil Yojana New Registration Process

  • अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लॉग इन करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर कृपया लॉगिन करा मध्ये स्वतःचा Username, Password आणि Captcha Code टाकून लॉग इन बटनावर क्लिक करावे लागेल.
Annasaheb patil loan scheme Log In Process

  • अशा प्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तक्रार करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर खाली Grievances वर क्लिक करावे लागेल.
Grievances Home Page

  • आता तुमच्यासमोर तक्रार करण्यासाठी अर्ज उघडेल त्यामध्ये तुमच्या तक्रारीची सर्व माहिती भरायची आहे व Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
Grievances From 1

Grievances From 2

  • अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदवली जाईल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत ग्राहक तिकीट पाहण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल
  • होम पेज वर खाली ग्राहक तिकीट बटनावर क्लिक करावे लागेल.
Grahak Ticket Home Page

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Username आणि Password टाकून पुढे बटनावर क्लिक करायचे आहे.
Grahak Ticket Login Page

  • आता तुमच्यासमोर तुमचे ग्राहक तिकीट दिसेल.
  • अशा प्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तुमचा LOI प्रमाणित करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर Validate LOI बटनावर क्लिक करावे लागेल.
Validate LOI Home Page

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Enter Application No. मध्ये तुमचा LOI क्रमांक टाकावा लागेल आणि सबमिट करा बटनावर क्लिक करावे लागेल.
Validate LOI Application ID Page

  • आता तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची माहिती येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म
अण्णासाहेब पाटील माहिती
अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत व्याज परतावा
अण्णासाहेब पाटील लोन बँक लिस्ट
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
Annasaheb Patil Loan Bank List PDF
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना व्यवसाय यादी
अण्णासाहेब पाटील योजना अंतर्गत लॉगिन पद्धत
Annasaheb Patil Mahamandal Loan Process
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना PDF
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Contact Number
Annasaheb Patil Registration
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जाचा नमुना
Annasaheb Patil Loan Apply Online
Annasaheb Patil Mahamandal Nashik Office Address
Annasaheb Patil Mahamandal Pune Office Address
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Aurangabad Office Address
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना शासन निर्णय

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

अण्णासाहेब पाटील योजना काय आहे?

संपर्क

पत्ताअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001
Emailapamvmmm[at]gmail[dot]com
Contact Number022-22657662
022-22658017
24 x 7 नागरी संपर्क केंद्र1800-120-8040
प्रकल्प अहवाल अर्जयेथे क्लिक करा
गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचनायेथे क्लिक करा
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment