लाभार्थ्याचे नाव | श्रीमती सिद्धी विनायक साळगावकर |
पत्ता | रा. होडावडा, ह. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग |
व्यवसाय | सिद्धी विनायक क्लॉथ आणि रेडीमेड गारमेंट, होडावडा |
योजनेचे नाव | बियाणे भांडवल कर्ज योजना |
माझ्या घरात कोणीही कमावते नव्हते त्यामुळे घरात आर्थिक टंचाई नेहमी जाणवत असे. नोकरी अथवा व्यवसायाच्या शोधात असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती मिळाली. त्यातील बीज भांडवल कर्ज योजना हा पर्याय योग्य वाटला. मला कापड विक्रीचा अनुभव असल्याने कापड दुकानाचा व्यवसाय निवडला व त्यानुसार माझ्या पतीच्या मदतीने दृढ निश्चय करुन महामंडळाच्या दिशा निर्देशानुसार योग्य त्या कागदपत्रासह कर्ज प्रकरण जिल्हा कार्यालयात जमा केले. यासाठी कार्यालयाचे सहाय्यक संचालक आणि नोडल अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आमचे गाव हे आसपासच्या पाच गावाची बाजारपेठ असल्याने व्यवसायाची सुरुवात उत्तम झाली. आज माझा व्यवसाय सुरळीतपणे चालू असून आमचा आर्थिक स्तर उंचावला आहे. त्या बद्दल महामंडळाचे शतशः आभार. |
लाभार्थ्याचे नाव | श्री मनोहर बाबुराव राऊळ |
पत्ता | रा. तेंडोली, ह. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग |
व्यवसाय | बॅटरी विक्री आणि दुरुस्ती |
योजनेचे नाव | बियाणे भांडवल कर्ज योजना |
मी 12वी पास झालो होतो पण आर्थिक परिस्थितीमुळे महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकलो नाही म्हणून मी पुणे येथे बँटरी दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. या अनुभवाचा स्वयंरोजगारासाठी उपयोग करून घेण्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज होती. त्यावेळी मला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती वर्तमान पत्रातून मिळाली. जिल्हा कार्यालात मी प्रत्यक्ष भेटून कर्ज योजनेची माहिती घेतली असता मला बीज भांडवल कर्ज योजनेची माहिती मिळाली व ती उपयुक्त वाटली. जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाचे सहाय्यक संचालक आणि नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या कागद पत्राची जुळवाजुळाव करून कर्ज अर्ज सादर केला. महामंडळ आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी उपलब्ध करून दिलेल्या कर्जाच्या साह्याने मी माझ्या अनुभवाचा फायदा घेऊन बँटरी विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. आज माझा व्यवसाय चांगल्याप्रकारे चालत असून चार माणसे माझ्याकडे कामाला आहेत. महामंडळाच्या सहकार्याने कधी काळी स्वतःसाठी रोजगार शोधणारा मी आज इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो आहे. त्या बद्दल महामंडळाचे धन्यवाद. [Annasaheb Patil] |
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
संपर्क
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | येथे क्लिक करा |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |