अण्णासाहेब पाटील योजना काय आहे?
अण्णासाहेब पाटील योजना काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील तरुण/तरुणींना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
या योजनेअंतर्गत जे तरुण/तरुणी स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेला एखाद्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी इच्छुक आहेत अशा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देते.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत ३ प्रकारच्या योजना राबविल्या जातात.
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
- गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
- गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)
योजनेचे उद्दिष्ट:
- मराठा समाजातील तरुण / तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे तसेच तरुणांच्या मनात स्वयंरोजगाराची भावना निर्माण करणे.
- राज्याचा आर्थिक विकास करणे.
- राज्यातील बेरोजगारी कमी करून इतर नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
पात्रता व अटी:
- अर्जदार तरुण//तरुणी महाराष्ट्र राज्याचा/राज्याची मूळ रहिवाशी असावी.
- अर्जदार व्यक्ती मराठा समाजाचा असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती कमीत कमी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- अर्जदार तरुण/तरुणी जो उद्योग सुरु करणार आहे त्या उद्योगाचा त्याच्याजवळ प्रकल्प अहवाल असणे गरजेचे आहे.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 10 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
कर्जावर आकारण्यात येणार व्याजदर:
- कर्जावर शून्य टक्के व्याजदर आकारला जातो. परंतु लाभार्थ्याला कर्जाचे नियमित हफ्ते जमा करणे अनिवार्य आहे.
कर्ज फेडण्याचा कालावधी:
- योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज लाभार्थ्याला 7 वर्षाच्या आत फेडणे गरजेचे आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अधिकृत वेबसाईट | Click Here |
---|---|
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | Click Here |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |