अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मराठी समाजातील तरुणांना शेती पूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते आणि पोल्ट्री फार्म हा एक शेतीला पूरक असा व्यवसाय आहे त्यामुळे ज्या तरुणांना स्वतःचे पोल्ट्री फार्म सुरु करायचे आहे अशा तरुणांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
महाराष्ट्र शासनाने वर्ष 1998 साली राज्यातील मराठा समाजातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ची स्थापना केली. या महामंडळाअंतर्गत तरुणांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म चे उद्दिष्ट:
- राज्यातील तरुणांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
- मराठी तरुणांना रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे.
- ग्रामीण भागात अर्थव्यवस्था मजबूत करणे.
- शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे.
योजनेची वैशिष्ट्ये:
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- योजनेअंतर्गत तरुणांना शेतीपूरक व्यवसाय सुरु करता येईल.
- तरुण स्वतःचा उद्योग सुरु करून राज्याचा औद्योगिक विकास करू शकतील.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना चे लाभार्थी:
- मराठी समाजातील तरुण/तरुणी
- शेतकरी
योजनेअंतर्गत दिली जाणारी कर्जाची रक्कम:
- पोल्ट्री फार्म प्रकल्पावर या कर्जाची रक्कम ठरवली जाते परंतु जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
कर्ज रकमेवर आकारले जाणारे व्याजदर:
- योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेवर 6 टक्के व्याजदर आकारला जातो.
कर्ज परत फेडण्याचा कालावधी:
- कर्ज परत फेडण्याचा कालावधी 5 वर्षे निर्धारित केला गेला आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक असून तो मराठा समाजातील असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 55 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती किमान इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला पोल्ट्री फार्म व्यवसायाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती बँक किंवा वित्त संस्थेचा थकबाकीदार असता कामा नये.
- एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदाराने पोल्ट्री फार्म महाराष्ट्र राज्यात सुरु करणे आवश्यक आहे.
योजनेचा फायदा
- कर्ज रक्कमेवर व्याजदर सवलतीचा लाभ
- अनुसूचित जाती आणि जमातींसाठी अतिरिक्त सवलत
- कर्ज परतफेडीसाठी अनुसूचित परतफेडीची मुदत
- विविध प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्राइविंग लायसेन्स
- रहिवाशी दाखला: डोमेसाइल प्रमाणपत्र, रेशन कार्ड, वीज बिल
- जातीचे प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र: इयत्ता 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
- प्रकल्प अहवाल: जो प्रकल्प सुरु करणार त्याचा अहवाल (पोल्ट्री फार्म प्रकल्प अहवाल)
- बँक खात्याची माहिती: बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- कौशल्य प्रमाणपत्र: पोल्ट्री फार्म प्रशिक्षण प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची काही कारणे:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
- अर्जदार मराठा समाजाचा नसल्यास
- अर्जदार पोल्ट्री फॉर्म चा व्यवसाय महाराष्ट्र राज्यात सुरु करत नसल्यास
- अर्जदार बँक किंवा वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्यास
- अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 55 वर्ष या दरम्यान नसल्यास
अतिरिक्त माहिती:
- पोल्ट्री फार्म सुरू करण्यापूर्वी त्या संबंधीची योजना तयार करणे आणि बाजारपेठेचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ द्वारे कौशल्य विकास प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात.
- पोल्ट्री फार्मसाठी विविध बँका आणि आर्थिक संस्थांकडून कर्ज योजना उपलब्ध आहेत.
पोल्ट्री फार्म साठी अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाच्या पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I ) वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि लागू करा बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती (अर्जदाराचे पहिले नाव, अर्जदाराचे मधले नाव, अर्जदाराचे आडनाव, जन्म दिनांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, लिंग) भरायची आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता अर्जदाराला त्यांचा निवास स्थानाची माहिती (राष्ट्रीयत्व, अधिवास राज्य, पॅनकार्ड क्रमांक, कायमचा पत्ता, शैक्षणिक अर्हता) भरायची आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता अर्जदाराला त्यांच्या कर्जाचा तपशील (व्यवसायाचे नाव, व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन, व्यवसायाचा पत्ता, बँकेकडून आवश्यक असलेली कर्ज रक्कम) भरायचा आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या प्रति (आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंब सदस्याचे IT रिटर्न, इतर कागदपत्रे) अपलोड करायच्या आहेत आणि अर्ज सबमिट करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर शपथ पात्र येईल त्यामध्ये I Agree वर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लॉग इन करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर कृपया लॉगिन करा मध्ये स्वतःचा Username, Password आणि Captcha Code टाकून लॉग इन बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तक्रार करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर खाली Grievances वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर तक्रार करण्यासाठी अर्ज उघडेल त्यामध्ये तुमच्या तक्रारीची सर्व माहिती भरायची आहे व Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदवली जाईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत ग्राहक तिकीट पाहण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर खाली ग्राहक तिकीट बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Username आणि Password टाकून पुढे बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर तुमचे ग्राहक तिकीट दिसेल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तुमचा LOI प्रमाणित करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Validate LOI बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Enter Application No. मध्ये तुमचा LOI क्रमांक टाकावा लागेल आणि सबमिट करा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची माहिती येईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | येथे क्लिक करा |
योजना अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना | येथे क्लिक करा |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |