अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती?
अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती?: राज्यात बहुतांश तरुण/तरुणी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असतात व नोकरी मिळवतात परंतु त्यातील काही तरुण/तरुणी हे त्यांच्या आवडीनुसार व कौशल्यानुसार स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचे मिळकतीचे साधन उपलब्ध नसल्यामुळे उद्योग सुरु करता येत नाही तसेच बँका व वित्तसंस्था त्यांना उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज देत नाहीत त्यामुळे तरुण/तरुणी इच्छा असून सुद्धा स्वतःचा उद्योग सुरु करण्यापासून वंचित राहतात त्यामुळे राज्यातील सुशिक्षित तरुण/तरुणीच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात जे सुशिक्षित तरुण स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा तरुणांना रोजगार सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. परंतु लाभार्थ्यांना व्याजाची रक्कम ही प्रत्येक महिन्याला दिलेल्या वेळेत महामंडळाला परत करावी लागते त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा करते. त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळते.

अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत 3 प्रकारच्या योजना राबविणायत येतात.
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
- गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
- गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)
1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
- जे तरुण वैयक्तिक व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा तरुणांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या योजनेअंतर्गत तरुणांना 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते व व्याजाची रक्कम वेळेत भरल्यास व्याज परताव्याची 12 टक्के रक्कम त्याच्या बँक खात्यात महामंडळामार्फत जमा करण्यात येते.
कर्ज मर्यादा | 15 लाख रुपये |
---|---|
व्याज दर | द.सा.द. शे. 12% |
व्याज परतावा | कर्जदार वेळेवर परतफेड करते तर कर्ज रकमेच्या 12% व्याज परतावा मिळतो. जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंत परतावा मिळू शकतो. |
विशेष | दिव्यांगांसाठी 4% निधी राखीव |
2. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
- जे तरुण गट तयार करून स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा तरुणांना गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या योजनेअंतर्गत तरुणांना 10 ते 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते व कर्जदाराने व्याजाची रक्कम वेळेत परत भरल्यास व्याजाची 12 टक्के रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
कर्ज मर्यादा | 10 ते ₹50 लाख रुपये |
---|---|
व्याज दर | द.सा.द. शे. 12% |
व्याज परतावा | कर्जदार वेळेवर परतफेड करते तर कर्ज रकमेच्या 12% व्याज परतावा मिळतो. |
3. गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)
- या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक (F.P.O.) गटांना (Farmers Producers Organisation-FPO) त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते तसेच कर्जाच्या रकमेची नियमित परतफेड केल्यास व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
कर्ज मर्यादा | 10 लाख रुपये (शेतकरी उत्पादक संघटनांसाठी) |
---|---|
व्याज दर | बिनव्याजी |
व्याज परतावा | कर्जदार वेळेवर परतफेड करतो तेव्हा 12% व्याजाची परतावा मिळते.2% व्याज परतावा मिळतो. |
टीप:
- वरील व्याज दर आणि परतावा रकमेमध्ये बदल होऊ शकतात त्यामुळे अद्ययावत माहितीसाठी, कृपया अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेमध्ये संपर्क साधा.
- अर्ज करण्यापूर्वी चालू व्याजदर काय आहे हे जाणून घ्या.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अधिकृत वेबसाईट | Click Here |
---|---|
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | Click Here |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |