अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना
★ महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याकरीता दिनांक 1 ऑगस्ट, 2020 पासून लाभार्थ्यांना 1) शासनाने दिलेलाच जातीचा दाखला 2) पॅन कार्ड व 3) रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य असेल.   ★ व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास, कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रती माहे असणे अनिवार्य आहे.   ★ दि. १ एप्रिल २०२१ पासून व्याजपरताव्याच्या लाभासाठी, बँक कर्ज मंजुरीच्या दिनांका पूर्वी L.O.I प्राप्त करणे अनिवार्य असेल.   ★ व्यासायिक वाहनाचे कर्ज घेतले असल्यास त्याचा हप्ता माहे असणे आवश्यक आहे, तथा व्यावसायिक वाहनावर नियमित भरणा केलेल्या कराची पावती अद्यावत करणे अनिवार्य आहे.   ★ ऑनलाईन व्याज परताव्याची मागणी करताना, संबंधित लाभार्थी जास्तीत-जास्त तीन महिन्यांच्या क्लेमची मागणी करु शकतो.   ★ महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. यासाठी ज्यांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे. तेच यांस पात्र राहतील.   ★ IR-I या योजनेअंतर्गत महामंडळ पात्र लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल व व्याज) अनुदान स्वरुपात लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करेल.   ★ जे महिला बचत गट “शेती पुरक व्यवसाय” करीत असतील, अशा सर्व महिला बचत गटांना महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ( IR- II ) असलेली जास्तीत-जास्त वयाची अट रद्द करण्यात येत आहे.   ★ शासन मान्य कोणताही गट, ज्यांचे सदस्य 100 टक्के शेतकरी वर्गातील असतील व त्यांना शेतीसंबंधीत व्यवसाय सुरु करावयाचे असतील, तर अशा गटांतील सदस्यांकरीता कमाल वय (45 वर्षे) मर्यादेची अट असणार नाही.   ★ गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत या अगोदर बँक कर्ज मर्यादेची रक्कम किमान रु. 10 ते कमाल रु. 50 लाख रुपयांची होती, ही अट शिथील करुन सुधारीत, बँक कर्ज मर्यादा जास्तीत-जास्त रु. 50 लाख करणेत येत आहे.   ★ कर्ज मंजूरीच्या दृष्टीने महामंडळाचा कोणत्याही अशासकीय संस्थेशी/ व्यक्तीशी करार झालेला नसून लाभार्थ्यांनी कोणत्याही संस्थेच्या/ व्यक्तीच्या आमीषाला बळी पडू नये. लाभार्थ्यांनी स्वत: बँकेकडे जाऊन कर्ज प्रकरण दाखल करावे.  

अण्णासाहेब पाटील वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I)

Annasaheb Patil Loan Scheme: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे मराठा समाजातील बेरोजगार तरुणांसाठी राबवली जाणारी एक विशेष कर्ज योजना आहे. या योजनेचा उद्देश मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी आर्थिक मदत करणे हा आहे.

नॉन-क्रिमिलेअर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार) असलेल्या व बँकेने 10 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणीकृत असून प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल.

या योजनेकरिता एकूण प्रस्तावित निधीच्या किमान 4 टक्के निधी दिव्यांगांसाठी (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या दिव्यांगांच्या व्याख्येनुसार) राखीव ठेवण्यात येत आहे. असे प्रस्ताव मिळालेल्या प्राप्त तारखेनुसार (First Come First Receiver या तत्वावर) निवडले जातील.

या महामंडळामार्फत आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना बँके तर्फे स्वयंरोजगार उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून केला जाईल.

अर्जदारांना महत्वाची सूचना:

  1. कृषी, संलग्न व पारंपारिक उपक्रम
  2. लघु व मध्यम उद्योग – अ) उत्पादन, ब) व्यापार व विक्री
  3. सेवा क्षेत्र

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) अंतर्गत उमेदवारांची नाव नोंदणी:

उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल. प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास उमेदवारांस संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of Intent)/मंजूरीपत्र दिले जाईल. उमेदवाराने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करुन घ्यावे.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) अंतर्गत परतावाच्या अटी:

महामंडळा मार्फत लाभार्थ्यास कर्जाच्या व्याज रक्कमेचा परतावा:

उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा मंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणीकृत असून प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएफएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल. महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल या ऐवजी इतर कोणतेही Charges / Fees/देयके अदा करणार नाही.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना:

अर्ज प्रणाली व अंमलबजावणीची पध्दत

ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारास महत्वाचे चार दस्तावेज अपलोड करणे अनिवार्य असेल:

  1. आधार कार्ड:
  2. रहिवासी पुरावा:
  3. उत्पनाचा पुरावा:
  4. जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला

इतर माहिती:

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना (वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) ) अंतर्गत लाभार्थी पात्रता:

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना (वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) ) अंतर्गत अटी व शर्ती:

नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

बँकेतून कर्ज घेताना आवश्यक कागदपत्रे:

व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) साठी अर्ज करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लॉग इन करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तक्रार करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत ग्राहक तिकीट पाहण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तुमचा LOI प्रमाणित करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ( IR-I )

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)

गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म

अण्णासाहेब पाटील माहिती

अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत व्याज परतावा

अण्णासाहेब पाटील लोन बँक लिस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

Annasaheb Patil Loan Bank List PDF

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना व्यवसाय यादी

अण्णासाहेब पाटील योजना अंतर्गत लॉगिन पद्धत

Annasaheb Patil Mahamandal Loan Process

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना PDF

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Contact Number

Annasaheb Patil Registration

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जाचा नमुना

अण्णासाहेब पाटील वाहन कर्ज योजना

Annasaheb Patil Loan Apply Online

Annasaheb Patil Mahamandal Nashik Office Address

Annasaheb Patil Mahamandal Pune Office Address

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Aurangabad Office Address

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना शासन निर्णय

यशोगाथा

अण्णासाहेब पाटील योजना काय आहे?


अधिकृत वेबसाईट Click Here
पत्ता अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001
Email apamvmmm[at]gmail[dot]com
Contact Number 022-22657662
022-22658017
24 x 7 नागरी संपर्क केंद्र 1800-120-8040
प्रकल्प अहवाल अर्ज Click Here
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here