Annasaheb Patil Loan Scheme: नॉन-क्रिमिलेअर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार) असलेल्या व बँकेने 10 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणीकृत असून प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल.
या योजनेकरिता एकूण प्रस्तावित निधीच्या किमान 4 टक्के निधी दिव्यांगांसाठी (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या दिव्यांगांच्या व्याख्येनुसार) राखीव ठेवण्यात येत आहे. असे प्रस्ताव मिळालेल्या प्राप्त तारखेनुसार (First Come First Receiver या तत्वावर) निवडले जातील.
या महामंडळामार्फत आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना बँके तर्फे स्वयंरोजगार उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून केला जाईल.
अर्जदारांना महत्वाची सूचना:
कर्ज मंजूरीच्या दृष्टीने महामंडळाचा कोणत्याही अशासकीय संस्थेशी/ व्यक्तीशी करार झालेला नसून लाभार्थ्यांनी कोणत्याही संस्थेच्या/ व्यक्तीच्या आमीषाला बळी पडू नये. लाभार्थ्यांनी स्वत: बँकेकडे जाऊन कर्ज प्रकरण दाखल करावे.
प्रकल्पाचे क्षेत्र (पूर्णत: महाराष्ट्र राज्यातीलच असावे)
i. कृषी, संलग्न व पारंपारिक उपक्रम
ii. लघु व मध्यम उद्योग – अ) उत्पादन, ब) व्यापार व विक्री
iii. सेवा क्षेत्र
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) अंतर्गत उमेदवारांची नाव नोंदणी:
उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल. प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास उमेदवारांस संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of Intent)/मंजूरीपत्र दिले जाईल. उमेदवाराने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करुन घ्यावे.
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) अंतर्गत परतावाच्या अटी:
- जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
- लाभार्थ्यांने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत.
महामंडळा मार्फत लाभार्थ्यास कर्जाच्या व्याज रक्कमेचा परतावा:
उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा मंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणीकृत असून प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएफएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल. महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल या ऐवजी इतर कोणतेही Charges / Fees/देयके अदा करणार नाही.
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना:
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी संबंधित अर्जदाराने यापूर्वी या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- ज्या जाती/गटासाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अश्या जाती/ गटांतील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील
- दिनांक 01 जानेवारी 2019 पासून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 वर्षे तर महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमिलेअरच्या मर्यादेत (जे 8 लाख रुपयांच्या मर्यादेत असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र) अथवा वैयक्तीक ITR (पती व पत्नीचे) प्रमाणे वार्षिक सकल उत्पन्न (Gross Income) ग्राह्य धरण्यात येईल व निव्वळ उत्पन्न (Net Taxable Income) ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- या योजनेअंतर्गत एकाच कुटूंबातील (रक्त नाते संबंधातील) व्यक्ती कर्जाकरीता सहकर्जदार राहीले असतील तर अशा प्रकरणांना देखील महामंडळ मंजूरी देत आहे. परंतू अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून असणे आवश्यक असेल.
- 1 जानेवारी 2019 पासून वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजने (IR–I) अंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतर पुढील 7 दिवसांच्या कालावधीमध्ये (शासकीय सुट्टया वगळून) आपले पात्रता प्रमाणपत्र ( L.O.I ) मंजूर/ नामंजूर/ त्रुटी/ अपूर्ण असल्याबाबतचे कळविण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/ कार्यरत असलेल्या व CBS प्रणालीयुक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.
- दिव्यांगासाठी योजनानिहाय एकूण निधीच्या 4 टक्के निधी राखीव ठेवण्यात येईल. दिव्यांग हा व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
- महामंडळाचे योजनेअंतर्गतचा लाभ हा कर्ज उचलल्यापासून 5 वर्षाकरीता किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल त्यासाठी लागू असेल.
- कर्ज रक्कम 10 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त 5 वर्ष व व्याजाचा दर जास्तीत-जास्त द.सा.द.शे. 12% असेल यानुसार जास्तीत-जास्त 3 लाखापर्यतच्या व्याज रकमेचा परतावा महामंडळामार्फत करण्यात येईल.
- वार्षिक कौंटुबिक उत्पन्नाची मर्यादा रुपये 8 लाखाच्या मर्यादेत असल्याकारणाने, आर्थिक दुर्बल घटकाच्या व्याख्येचे अवलोकन करुन, लाभार्थ्यांचे व्यावसायिक कर्ज कमाल रुपये 25 लाखाच्या मर्यादेतील असणे अनिवार्य असेल.
- जर कोणत्याही लाभार्थ्यांचे रुपये 25 लाखाच्या वरील व्यावसायिक कर्ज असल्यास अशा कर्जांचा समोवश या योजनेअंतर्गत करण्यात येणार नाही.
- या योजनेअंतर्गत निम्न-कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटूंबातील उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत केवळ बँकेमार्फत मंजूर झालेल्या कर्जांवरील व्याज परतावा करण्यात येईल.
अर्ज प्रणाली व अंमलबजावणीची पध्दत:
- उमेदवाराने या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम स्वत:ची राज्य शासनाच्या अधिकृत वेब प्रणालीवर आधार कार्ड सहीत नोंदणी करणे अनिवार्य असेल.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरीता महामंडळाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करते वेळीस, आधारलिंक मोबाईलवर O.T.P. द्वारे, मोबाईल ॲप द्वारे अथवा तत्सम U.I.D. युक्त प्रणालीद्वारे नोंदणी करावयाची आहे. यासाठी उमेदवाराने सध्याचा वापरात असलेला मोबाईल नंबर, आधार क्रमांकासोबत अद्यावत ( LINK ) करावा, कारण नोंदणी करताना सदरचा O.T.P. नमूद केल्याशिवाय नोंदणी प्रक्रीया पूर्ण होऊ शकत नाही.
- उमदवाराने ऑनलाईन अर्ज भरुन Submit केल्याच्या पुढील 7 दिवसांच्या आत ( शासकीय सुट्टया वगळून ) उमेदवार कर्ज व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे किंवा नाही किंवा त्यामध्ये असलेल्या त्रुटींबाबत महामंडामार्फत उमेदवारास कळविण्यात येईल. तद्नंतर संबंधित उमेदवार या योजनेअंतर्गत व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास संबंधित उमेदवाराला पात्रता प्रमाणपत्र (LOI) ऑनलाईन प्राप्त होईल. तसेच, त्यासमवेतच कर्ज हमी संबंधीचे शासनाचे पत्र देखील ऑनलाईन प्राप्त होईल.
- अर्जदाराने अटी व शर्ती मंजूर असल्याबाबतचे शपथपत्र ऑनलाईन फॉरमॅटमध्ये भरावयाचे आहे.
ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारास महत्वाचे 4 दस्तावेज अपलोड करणे अनिवार्य असेल
- I. आधार कार्ड:
- (अर्जदाराचा फोटो व आधार क्रमांक असलेली बाजू अपलोड करणे आवश्यक असेल)
- II. रहिवासी पुरावा:
- (खालीलपैकी एक पुरावा जोडलेला असणे आवश्यक असेल) अद्यावत लाईट बील / अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक / अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला / रेशन कार्डची प्रत / अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत / भाडे कराराची प्रत ( ( उपरोक्त पैकी पुरावा जोडताना अर्जदाराच्या नावाचा नसेल तर संबंधिताशी असणारे नाते दर्शविणारा अन्य पुरावा जोडावा)
- III. उत्पनाचा पुरावा:
- तहसिलदारांनी दिलेले अद्यावत कौटूंबिक उत्पन्नाचा दाखला किंवा अद्यावत ITR ची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) पती/ पत्नीची ITR ची प्रत जोडणे आवश्यक असेल.
- IV. जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला:
- लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर 6 महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.
- या योजनेअंतर्गत, महामंडळ लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल + व्याज) अनुदान स्वरुपात अदा करेल. तसेच त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत (12 टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज व्याज परतावा करेल. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत-जास्त 3 लाखापर्यंत व्याज परतावा अधिक प्रोत्साहनपर पहिला हप्ता देणेत येईल.
- Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises (CGTMSE) योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज प्राप्त झाले आहे. अशा लाभार्थ्यांना CGTMSE योजनेअंतर्गत आकारण्यात आलेले Premium शूल्क व्याज परताव्याच्या रकमेसोबत, लाभार्थ्याने दावा केल्यानंतर महामंडळ संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करेल.
- कर्ज देणाऱ्या बँकेच्या नियमानुसार व्याजाची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतर, एक-रकमी स्वरुपात महामंडळ हे लाभार्थ्याच्या आधारलिंक कर्ज खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करेल. हा परतावा प्रत्येक महिन्याला वेळेवर हफ्ता परतफेड केल्यास देणेत येईल.
- अर्जदाराने या अर्जीत प्रकल्पासाठी इतर कोणत्याही योजनेअंतर्गत व्याज परतावा / माफी / Interest Subvention योजनेचा लाभ घेतलेला आढळल्यास एकूण आवश्यक व्याज परतावा वजा इतर योजेनतून घेतलेला व्याजाचा लाभ एवढाच अनुज्ञेय असेल. (उदा. व्याज परतावा आवश्यकता 12% वजा इतर योजनेतून घेतलेला लाभ 5% आहे = 7% एवढा या योजनेतून मिळणारा लाभ असेल.)
- लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर 6 महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे 2 फोटो अपलोड करावयाचे आहेत. तसेच त्यानंतर प्रत्येक 4 महिन्यानंतर लाभार्थ्याने त्याच्या व्यवसायाचे अद्ययावत फोटो अपलोड करावयाचे आहेत.
- लाभार्थ्याला महामंडळाच्या योजनेचा लाभ प्राप्त झाल्यानंतर, लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या फलकावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक सहाय्यातून सदरचा व्यवसाय सुरु केल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख करावा. (उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सौजन्याने)
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना (वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) ) अंतर्गत लाभार्थी पात्रता:
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना (वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) ) अंतर्गत अटी व शर्ती:
- अर्जदार पुरुषांकरिता वयाची अट जास्तीत जास्त 50 वर्ष तर महिला अर्जदाराकरिता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल.
- अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य राहील.
- 50 वर्षे वरील पुरुष उमेदवार व 55 वर्षावरील महिला उमेदवारांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत अर्ज करता येणार नाही.
- ऑनलाईन व्याज परताव्याची मागणी करताना संबंधित लाभार्थी जास्तीत-जास्त 3 महिन्यांच्या क्लेमची मागणी करु शकतो.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रती माहे असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने निर्धारती केलेल्या मर्यादेमध्ये असावे.
- अर्जदाराने या पूर्वी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अक्षम मापदंडांच्या अंतर्गत अर्ज करताना अर्जदाराकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला केवळ एकदाच अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.
- महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण / तरुणींना दिला जाईल यासाठी ज्यांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे. तेच या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- अर्जदार दिव्यांग असेल तर अर्ज दाखल करताना दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. दिव्यांग उमदेवाराकडे सक्षम यंत्रणेने दिलेले प्रमाणपत्र असावे.
- अर्जदार व्यक्ती कुठल्याही बँकेचा किंवा वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- 1 सप्टेंबर 2019 पासून व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाचे नाव, उद्योग आधार नोंदणी तपशील, उद्योगाचा फोटो व बँकेच्या कर्ज मंजूरीवर उद्योगाचे नाव नमूद असल्याचा तपशील / पुरावा अपलोड करावा.
- 1 एप्रिल 2021 पासून व्याज परताव्याच्या लाभासाठी बँक कर्ज मंजुरीच्या दिनांकापूर्वी L.O.I प्राप्त करणे अनिवार्य असेल व उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.
- व्यासायिक वाहनाचे कर्ज घेतले असल्यास त्याचा हप्ता माहे असणे आवश्यक आहे, तथा व्यावसायिक वाहनावर नियमित भरणा केलेल्या कराची पावती अद्यावत करणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराला या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय हा फक्त महाराष्ट्र राज्यात सुरु करणे बंधनकारक आहे.
- उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
- जातीचा दाखला
- रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू)
- रहिवाशी दाखला
- वयाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- प्रकल्प अहवाल
बँकेतून कर्ज घेताना आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- वीज बिल
- उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- सिबिल रिपोर्ट
- व्यवसाय-प्रकल्प अहवाल
- व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- बँक कर्ज मंजुरी पत्र
- बँक स्टेटमेंट
- उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- व्यवसायाचा फोटो
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) साठी अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाच्या पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I ) वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि लागू करा बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती (अर्जदाराचे पहिले नाव, अर्जदाराचे मधले नाव, अर्जदाराचे आडनाव, जन्म दिनांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, लिंग) भरायची आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता अर्जदाराला त्यांचा निवास स्थानाची माहिती (राष्ट्रीयत्व, अधिवास राज्य, पॅनकार्ड क्रमांक, कायमचा पत्ता, शैक्षणिक अर्हता) भरायची आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता अर्जदाराला त्यांच्या कर्जाचा तपशील (व्यवसायाचे नाव, व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन, व्यवसायाचा पत्ता, बँकेकडून आवश्यक असलेली कर्ज रक्कम) भरायचा आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या प्रति (आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंब सदस्याचे IT रिटर्न, इतर कागदपत्रे) अपलोड करायच्या आहेत आणि अर्ज सबमिट करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर शपथ पात्र येईल त्यामध्ये I Agree वर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी करण्याची पद्धत
Annasaheb Patil Registration Process
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लॉग इन करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर कृपया लॉगिन करा मध्ये स्वतःचा Username, Password आणि Captcha Code टाकून लॉग इन बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तक्रार करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर खाली Grievances वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर तक्रार करण्यासाठी अर्ज उघडेल त्यामध्ये तुमच्या तक्रारीची सर्व माहिती भरायची आहे व Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदवली जाईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत ग्राहक तिकीट पाहण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर खाली ग्राहक तिकीट बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Username आणि Password टाकून पुढे बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर तुमचे ग्राहक तिकीट दिसेल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तुमचा LOI प्रमाणित करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Validate LOI बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Enter Application No. मध्ये तुमचा LOI क्रमांक टाकावा लागेल आणि सबमिट करा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची माहिती येईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
संपर्क
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | येथे क्लिक करा |
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR- I) अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना | येथे क्लिक करा |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
Thanks for help
सदर योजनेअंतर्गत १५ लाख रूपये कर्ज मंजूरीसाठी बॅंकेकडुन तारण म्हणून जमिन अथवा स्थावर मालमत्ता मॉरगेज करणेबाबत सांगत आहे. तरी सदर योजनेसाठी अशी मालमत्ता तारण म्हणून देणे आवश्यक आहे किंवा कसे
तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन भेट द्यायची आहे.
सदर योजनेसाठी बॅक अधिकारी यांना भेटलो असता सदर योजनेअंतर्गत आपणास ७५ टक्के कर्ज मिळू शकते तुम्ही स्वत २५ टक्के रक्कम बॅक खात्यात जमा करणे आवश्यक असलेबाबत सांगीतले आहे. सदर बाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन भेट द्यायची आहे.
Mala pan krj pahije
तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी नक्कीच कर्ज दिले जाईल.
Please help me car loan sathi pahije ahe …
Pune . Pirangut ganesh nagar
ta. Mulshi dist. Pune
हो, नवीन वाहन खरेदीसाठी तुम्हाला नक्कीच कर्ज दिले जाईल.
Car loan tourist sathi pahije ahe
हो, नवीन वाहन खरेदीसाठी तुम्हाला नक्कीच कर्ज दिले जाईल.
I need monny for my business and my home
in this scheme, only provide loan for business