Annasaheb Patil Tractor Yojana: अण्णासाहेब पाटील महामंडळ राज्यातील बेरोजगार युवकांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता यावा यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करत देत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी देखील एक नवीन योजना राबविण्यात आलेली आहे ज्या योजनेचे नाव अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीची कामे जलद गतीने व्हावी तसेच शेतात आधुनिकीकरणाचा वापर व्हावा व शेतकऱ्यांना शेती करतात सुलभता व्हावी यासाठी या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे ज्याचा उद्देश मराठा समाजातील तरुणांना ट्रॅक्टर खरेदीसाठी वित्तीय मदत पुरवणे आहे.
शेतकऱ्यांचा मिळणार कमी प्रतिसाद पाहून सदर योजना बंद करण्यात आली होती परंतु पुन्हा एकदा अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना सुरु करण्यात आलेली आहे व महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
महामंडळामार्फत करण्यात आलेले महत्वाचे बदल
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1) अंतर्गत कर्ज मर्यादा 10 लाखांवरुन 15 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- 3 लाख रुपयांच्या मर्यादेत करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा 4.5 लाख रुपयांपर्यंत वाढवून कर्ज कालावधी 5 वर्षांहून 7 वर्षापर्यंत वाढविला आहे.
- महामंडळाच्या योजनेअंतर्गत वयाची मर्यादा 60 वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे.
योजनेचे नाव | अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना |
लाभ | ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बिनव्याजी कर्ज |
लाभार्थी | शेतकरी |
उद्देश | जीवनमान सुधारणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चे उद्दिष्ट
- मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे.
- शेती क्षेत्रात मशीनीकरणाला प्रोत्साहन देणे.
- ग्रामीण रोजगार निर्मिती वाढवणे.
- शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
- शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चे वैशिष्ट्य
- योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
- अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चे लाभार्थी
- राज्यातील शेतकरी
Annasaheb Patil Tractor Yojana अंतर्गत दिला जाणारा लाभ
- अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 15 लाखांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
- अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत कर्ज फेडण्याचा कालावधी.
- लाभार्थी शेतकऱ्यांना 7 वर्षाच्या आत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.
- 5% व्याजदरानं 5 वर्षांसाठी कर्ज मिळते.
- महिला आणि विकलांग उमेदवारांना अतिरिक्त 2% सवलत मिळते.
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चा शेतकऱ्यांना होणारा फायदा
- शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध होईल.
- शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- ट्रॅक्टर मुले शेतीची कामे जलद गतीने होतील त्यामुले शेतकऱ्याच्या वेळेची बचत होईल.
- पारंपरिक शेती पद्धतीपासून सुटका मिळेल.
- शेतकऱ्यांना शेतात कष्टाची कामे करावी लागणार नाहीत.
- शेती क्षेत्राचा विकास होईल तसेच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
- शेती क्षेत्रात मशीनीकरण वाढल्याने शेतीची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढेल.
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चे नियम व अटी
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चा लाभ दिला जाईल.
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे व त्याच्याजवळ शेती योग्य जमीन असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या एखाद्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चा लाभ मिळवला असता कामा नये.
- अर्जदार बँक किंवा वित्त संस्थेचा थकबाकीदार असता कामा नये.
- ट्रॅक्टर खराब झाल्यास त्याची दुरुस्थी तसेच देखभाल लाभार्थ्याला स्वखर्चाने करावी लागेल त्यामुळे महामंडळाकडून कुठल्याच प्रकारचा दुरुस्थी व देखभाल खर्च दिला जाणार नाही.
- एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळवता येईल.
- फक्त मराठा समाजातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदार शेतकऱ्याने कोणतेही सरकारी अनुदान किंवा कर्ज घेतलेले असता कामा नये.
- अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक.
- अर्जदार किमान इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतल्यास कर्जफेडीचा ईएमआय हा प्रति महिना असणे आवश्यक आहे.
- व्याज परताव्याच्या लाभासाठी बँक कर्ज मंजुरीच्या दिनांक लाभार्थीने पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक असेल.
- अर्जदाराने निवडलेली बँक ही पत हमी अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मुदल व व्याज अनुदान स्वरूपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहे.
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
- 7/12 दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर
- बँक खात्याची माहिती
- शपथपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा:
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या मराठा विकास महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
महत्वाच्या बाबी:
- अनुसूचित जाती आणि जमाती (एससी आणि एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना 50% अनुदान.
- सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 25% अनुदान.
- 4% ते 9% पर्यंत व्याजदर असलेले कर्ज.
- जास्तीत जास्त 15 लाखापर्यंत कर्ज.
- लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या 25% रक्कम स्वतःची गुंतवणूक करणे आवश्यक.
योजनेचे काही तोटे:
- या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुणांनाच मिळतो त्यामुळे इतर समाजातील तरुणांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येत नाही.
- कर्जावरील व्याजदर 5% आहे, जे काही कर्जदारांसाठी जास्त असू शकते.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात जे काही शेतकऱ्यांना शक्य नसते.
योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी नसल्यास
- एकाच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्तीने राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान घेतले असल्यास.
- अर्जदार व्यक्ती बँकेचा थकबाकीदार असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात खोटी माहिती भरल्यास
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना ही मराठा समाजातील तरुणांसाठी एक उपयुक्त योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन तरुण आपला शेती व्यवसाय आधुनिक बनवू शकतात आणि त्यांचे जीवनमान उंचावू शकतात.
एकंदरीत, अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना ही मराठा समाजातील तरुणांसाठी एक चांगली योजना आहे. या योजनेमुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान देण्यास मदत मिळेल.
Annasaheb Patil Mahamandal Tractor Yojana अंतर्गत पात्र असणाऱ्या बँका
बँकेचे नाव | बँक | बँकेच्या जिल्हानिहाय शाखा |
सारस्वत को-ऑप. बँक मर्यादित. | मुंबई | अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, मुंबई, मुंबई उपनगर, हिंगोली, जलगाव, जालना, कोल्हापुर, नागपुर, नाशिक, नांदेड, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग, सोलापूर, ठाणे, यवतमाळ, पालघर, वाशिम. |
लोकविकास नागरी सह. बँक लि. औरंगाबाद | औरंगाबाद | औरंगाबाद |
श्री. विरशैव को-ऑपरेटीव्ह बँक मर्या., कोल्हापुर | कोल्हापुर | सांगली, पुणे, मुंबई |
श्री. वारणा सहकारी बँक लिमि. वारणानगर | कोल्हापुर | अहमदनगर, पुणे, सांगली, मुंबई |
श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह को-ऑपरेटिव्ह बँक | कोल्हापुर | पुणे, सांगली, मुंबई |
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमि. | कोल्हापुर | अहमदनगर, औरंगाबाद, जालना, सांगली, नाशिक, पुणे, मुंबई, लातुर, सोलापुर, सातारा, रत्नागिरी, ठाणे. |
श्री. आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. इचलकरंजी | कोल्हापुर | कोल्हापुर, सांगली |
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमि | मुंबई | मुंबई, पालघर, रायगड, |
सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमि सिंधुदूर्ग. | सिंधुदूर्ग | सिंधुदूर्ग |
देवगिरी नगरी सहकारी बँक, औरंगाबाद | औरंगाबाद | बुलढाणा, जालना, परभणी, अहमदनगर, जळगाव, पुणे, ठाणे. |
द चिखली अर्बन को. ऑपरेटीव्ह बैंक लिमि. चिखली, बुलढाणा | बुलढाणा | अकोला, वाशिम, औरंगाबाद, जालना, नाशिक, जळगाव |
राजारामबापू सहकारी बैंक लिमि. पेठ, सांगली | सांगली | कोल्हापुर, पुणे, मुंबई |
ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे | ठाणे | अकोला, नागपुर, औरंगाबाद, जालना, लातूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापुर, कोल्हापुर, रायगड, रत्नागिरी |
दि पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बैंक मर्या, पनवेल | रायगड | रायगड |
हुतात्मा सहकारी बैंक मर्या, वाळवा | सांगली | कोल्हापुर, मुंबई |
राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑप. बँक लि. कागल | कोल्हापूर | कोल्हापुर |
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, चंद्रपुर | चंद्रपुर | चंद्रपुर |
राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूर | राजापूर | रत्नागिरी, सिंधुदूर्ग |
नाशिक जिल्हा महिला सहकारी बैंक मर्यादित, | नाशिक | नाशिक |
यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक मर्यादित | यवतमाळ | यवतमाळ, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपुर, गोंदिया, जालना, नांदेड, नागपूर, पुणे,वाशिम. |
शरद नागरी सहकारी बैंक मर्यादित | सोलापुर | सोलापुर |
लोकमंगल को-ऑप. बँक मर्यादित सोलापुर | सोलापुर | सोलापुर |
प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक | बीड | बीड |
पलूस सहकारी बँक पलूस | सांगली | सांगली, कोल्हापुर, सोलापुर, रत्नागिरी. |
रामेश्वर को. ऑप. बँक मर्यादित | मुंबई उपनगर | मुंबई उपनगर (बोरिवली) |
रैंडल सहकारी बँक मर्यादित, रेंडल | कोल्हापूर | कोल्हापुर |
कुरूंदवाड अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, कुरूंदवाड | कोल्हापूर | कोल्हापुर |
श्री. अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँक | ठाणे | ठाणे |
जनता सहकारी बँक अमरावती | अमरावती | अमरावती |
दि अमरावती मर्चंट को-ऑप. बँक मर्यादित | अमरावती | अमरावती |
अभिनव अर्बन को-ऑप. बँक मर्यादित | अमरावती | अमरावती, नागपुर. |
जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई | मुंबई | मुंबई, मुंबई उपनगर |
अरिहंत को-ऑप बँक | मुंबई उपनगर | मुंबई उपनगर, मुंबई |
दि कराड अर्बन को-ऑप बँक | सातारा | सातारा, सोलापूर |
विदर्भ मर्चंट को-ऑप. बँक मर्यादित, हिंगणघाट | वर्धा | वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती, चंद्रपूर. |
दि व्यंकटेश्वरा सह. बँक लि. इचलकरंजी | कोल्हापूर | कोल्हापूर |
सेंट्रल को. ऑप. बँक लि. कोल्हापूर | कोल्हापूर | कोल्हापूर |
सांगली अर्बन को-आपरेटीव्ह बँक लिमि., सांगली | सांगली | जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, पुणे, सोलापुर, मुंबई शहर |
दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बैंक | नांदेड | नांदेड |
गोदावरी अर्बन बँक | नाशिक | नाशिक |
श्री. नारायण गुरू को. ऑप. बँक लि. | मुंबई उपनगर | मुंबई उपनगर, ठाणे. |
श्रीकृष्ण को. ऑप. बँक लि. | नागपूर | नागपुर |
नागपुर नागरी सहकारी बँक | नागपूर | नागपुर |
सातार सहकारी बँक | सातारा | सातारा, मुंबई शहर, मुंबई उपनगर |
दि हस्ती को. ऑप. बँक लिमी. | धुळे | धुळे |
दि बुलढाणा जिल्हा केंद्रिय सह. बँक म. बुलढाणा | बुलढाणा | बुलढाणा |
अनुराधा अर्बन को-ऑप. बँक लिमी. | बुलढाणा | बुलढाणा |
जनता सहकारी बँक लिमी. गोंदिया | गोंदिया | गोंदिया, भंडारा, चंद्रपुर, |
निशीगंधा सहकारी बँक | सोलापूर | सोलापूर |
महाराष्ट्र नागरी सहकारी बैंक मर्या. लातूर | लातूर | लातूर |
सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा | सातारा | सातारा |
येस बँक लि. (Yes Bank LTD.) | मुंबई | सर्व जिल्हे |
रायगड सहकारी बँक लिमिटेड | मुंबई | रायगड, मुंबई. |
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाच्या पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I ) वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि लागू करा बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती (अर्जदाराचे पहिले नाव, अर्जदाराचे मधले नाव, अर्जदाराचे आडनाव, जन्म दिनांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, लिंग) भरायची आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता अर्जदाराला त्यांचा निवास स्थानाची माहिती (राष्ट्रीयत्व, अधिवास राज्य, पॅनकार्ड क्रमांक, कायमचा पत्ता, शैक्षणिक अर्हता) भरायची आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता अर्जदाराला त्यांच्या कर्जाचा तपशील (व्यवसायाचे नाव, व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन, व्यवसायाचा पत्ता, बँकेकडून आवश्यक असलेली कर्ज रक्कम) भरायचा आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या प्रति (आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंब सदस्याचे IT रिटर्न, इतर कागदपत्रे) अपलोड करायच्या आहेत आणि अर्ज सबमिट करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर शपथ पात्र येईल त्यामध्ये I Agree वर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Annasaheb Patil Tractor Yojana]
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. [Annasaheb Patil Tractor Yojana]
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत लॉग इन करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर कृपया लॉगिन करा मध्ये स्वतःचा Username, Password आणि Captcha Code टाकून लॉग इन बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तक्रार करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर खाली Grievances वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर तक्रार करण्यासाठी अर्ज उघडेल त्यामध्ये तुमच्या तक्रारीची सर्व माहिती भरायची आहे व Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदवली जाईल.
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत ग्राहक तिकीट पाहण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल
- होम पेज वर खाली ग्राहक तिकीट बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Username आणि Password टाकून पुढे बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर तुमचे ग्राहक तिकीट दिसेल.
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत तुमचा LOI प्रमाणित करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Validate LOI बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Enter Application No. मध्ये तुमचा LOI क्रमांक टाकावा लागेल आणि सबमिट करा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची माहिती येईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
संपर्क
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | येथे क्लिक करा |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
Hi
तुमचा प्रश्न विचारू शकता