अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जाचा नमुना: अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत 3 योजना राबविल्या जातात त्यामुळे त्या योजनांसाठी आवश्यक अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. तो भरून तुम्ही सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून महामंडळात जमा करू शकता.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जाचा नमुना:
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) अंतर्गत अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) अंतर्गत अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
र्जासोबत आवश्यक कागदपत्रे:
- ओळखपत्र: (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
- जात प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला.
- रहिवाशी दाखला: डोमेसाइल प्रमाणपत्र/वीज बिल/रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
- शिक्षण प्रमाणपत्र: इयत्ता 10वी, 12वी, 15वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र: जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- प्रकल्पाचा अहवाल: (केवळ GL-I साठी)
- गट हमीपत्र: (केवळ IR-II आणि GL-I साठी)
- इतर आवश्यक कागदपत्रे (योजनेनुसार)
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी:
अर्ज सादर करण्याचे दोन मार्ग आहेत:
- ऑनलाइन अर्ज:
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- नवीन अर्जदार नोंदणी करा
- आपल्या लॉगिन आणि पासवर्ड ने लॉगिन करा
- तुमच्या योजनेची निवड करा आणि क्लिक करा
- आता योजनेचा अर्ज उघडेल तो भर आणि सोबत आवश्यक कागदपत्रे जमा करा
- आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- ऑफलाइन अर्ज:
- जवळच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातून योजनेचं अर्ज मिळवा.
- अर्जात विचारलेली माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा.
योजनेच्या अधिक माहितीसाठी:
योजनेच्या अधिक माहितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्या किंवा आपल्या क्षेत्रातील जवळच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाशी संपर्क साधा.
टीप:
- अर्ज करण्यापूर्वी आपण कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहात याची खात्री करून घ्या (वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, किंवा गट प्रकल्प कर्ज योजना).
- अर्ज अचूक भरून आणि आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून जमा करा.
- अर्ज स्वीकारल्यानंतर, महामंडळ आपल्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करेल.
- तपासणी पूर्ण झाल्यावर, महामंडळ आपल्या अर्जाला मंजुरी देईल किंवा नाकारेल याबद्दल निर्णय घेईल.
- अर्जात कुठल्याही प्रकारची खोटी माहिती भरून नका. अर्जात खोटी माहिती आढळून आल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडा.
- अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
संपर्क
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | येथे क्लिक करा |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |