Annasaheb Patil Mahamandal Loan Process: महाराष्ट्र राज्यातील जे तरुण/तरुणी स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत बिनव्याजी कर्ज दिले जाते आहे. परंतु बहुतांश तरुण/तरुणींना या योजनेची कार्यपद्धती माहित नाही त्यामुळे बहुतांश युवकांना अर्ज करताना अडचणी येताना दिसून आल्या आहेत त्यामुळे युवकांना अर्ज करताना कुठल्याच प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी आम्ही अर्ज प्रक्रिया व अर्ज केल्यानंतर ची कार्यपद्धती ची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्जदारांना विनंती आहे कि तुम्ही हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा.
महत्वाचे घटक:
1 अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराला या योजनेचे अटी व नियम जाणून घ्यावयाचे आहेत.
2 अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे जाणून घ्यावयाचे आहेत.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची कार्यपद्धती:
- अर्जदाराला सर्वात प्रथम अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर नवीन अर्जदार नोंदणी बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून पुढे बटनावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी केल्यावर तुम्हाला तुमचा Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यावर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार योजनेची निवड करावी लागेल (वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) / गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) / गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) )
- आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी बटनावर क्लिक करावे लागेल..
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल, तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल, निवासी तपशील, कर्जाचा तपशील भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील सर्व माहिती भरून झाल्यावर submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अर्ज केल्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत अर्जाची केली जाणारी कार्यपद्धती:
- अर्ज केल्यानंतर महामंडळ अधिकाऱ्यांमार्फत तुमच्या अर्जाची तपासणी केली जाते तसेच तुमच्या कागदपत्रांची देखील तपासणी केली जाते.
- जर तुमची माहिती तसेच कागदपत्रे योग्य असल्यास तसेच तुम्ही योजनेअंतर्गत घालून दिलेल्या नियमात बसत असल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत पात्र ठरविले जाते.
- तुम्ही पात्र किंवा अपात्र असल्याची माहिती तुम्हाला मोबाईल वर मेसेज करून तसेच पोर्टल वर अपलोड करून सांगितले जाते.
- जर तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला तुमच्या कागदपत्रांसह कार्यालयात जाऊन तुमची Original कागदपत्रे दाखावावी लागतात.
- त्या नंतर तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते व कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.
कर्ज मंजुरीची कार्यपद्धती व अर्ज मंजूरीचे टप्पे:
- अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास सिस्टीम द्वारे SMS व email सूचना प्राप्त होईल.
- स्थळ पाहणीसाठी लाभार्थी वेबपोर्टलद्वारे दिनांक व वेळ स्वतः निश्चित करेल त्यानुसार संबधीत जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालया मार्फत प्रस्तावित व्यवसायाच्या जागेची, वास्तव्याच्या स्थळाची पाहणी तसेच जामीनदाराची पडताळणी करण्यात येईल.
- सादर केलेल्या कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर बँकेकडे पाठवण्यात येतो.
- बँकेने कर्ज मंजुरी आदेश दिल्यानंतर कर्ज प्रकरणाची फाईल आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून महामंडळाकडे मंजुरीकरिता पाठवण्यात येते.
- महामंडळाकडून कर्ज प्रकरण मंजुरी केल्यानंतर मंजुरी आदेश अर्जदारास सिस्टीम द्वारे (SMS व email) प्राप्त होईल. त्यानंतर अर्जदाराकडून वैधानिक कागदपत्राची पूर्तता करून घेण्यात येईल.
- त्यानंतर महामंडळाकडून बीज भांडवलाच्या रकमेचा धनाकर्ष (डीडी) जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात येतो व त्याची माहिती लाभार्थ्याला सिस्टीम द्वारे (SMS व email) देण्यात येते.
- महामंडळाकडून प्राप्त झालेले बीज भांडवल आणि बँकेने मंजूर केलेली कर्जाची रक्कम एकत्रितपणे अर्जदाराच्या बँक खाती जमा करण्यात येते. तुम्हाला कर्ज परतफेडीसाठी निश्चित मुदत दिली जाते.
- कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यावर लाभार्थ्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, ई–मेल वर प्राप्त होईल.
आवश्यक कागदपत्रे:
- ओळखपत्र: (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
- जात प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला.
- रहिवाशी दाखला: डोमेसाइल प्रमाणपत्र/वीज बिल/रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
- शिक्षण प्रमाणपत्र: इयत्ता 10वी, 12वी, 15वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र: जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- प्रकल्पाचा अहवाल: (केवळ GL-I साठी)
- गट हमीपत्र: (केवळ IR-II आणि GL-I साठी)
- इतर आवश्यक कागदपत्रे (योजनेनुसार)
अतिरिक्त माहिती:
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ विविध कर्ज योजना राबवते, जसे की:
- स्वयंरोजगार कर्ज योजना
- उद्योग स्थापना कर्ज योजना
- सेवा व्यवसाय कर्ज योजना
- महिला उद्योजक कर्ज योजना
टीप:
- योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता आणि अटी यामध्ये बदल होऊ शकतो.
- विविध कर्ज योजनांसाठी पात्रता, रक्कम, व्याजदर आणि अटी भिन्न असू शकतात त्यामुळे अद्ययावत माहितीसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेमध्ये संपर्क साधा.
- अर्ज अचूक भरून आणि आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून जमा करा.
- अर्ज स्वीकारल्यानंतर, महामंडळ आपल्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करेल.
- तपासणी पूर्ण झाल्यावर, महामंडळ आपल्या अर्जाला मंजुरी देईल किंवा नाकारेल याबद्दल निर्णय घेईल.
- अर्जात कुठल्याही प्रकारची खोटी माहिती भरून नका. अर्जात खोटी माहिती आढळून आल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडा.
- अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
संपर्क
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | येथे क्लिक करा |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |